नागपूर : ‘अभंग रिपोस्ट’ मध्ये रसिकांची ब्रम्हानंदी समाधी

Nagpur News | खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप
 Nagpur  cultural festival
खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवात सहा युवकांनी पारंपरिक अभंगांना पाश्‍चात्‍य संगीताचा बाज चढवला. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आधुनिक वेशभूषा केलेल्‍या सहा युवकांनी पारंपरिक अभंगांना पाश्‍चात्‍य संगीताचा बाज चढवत मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित ज्‍येष्‍ठांच्‍या काळजाला हात घालत, त्यांना ठेका धरायला, नाचायला आणि फुगड्या खेळायला भाग पाडले. संतश्रेष्ठ ज्ञानदेव, तुकाराम, जनाबाई, नामदेव, तुकडोजी महाराज यांचे अभंग ऐकताना, जिन्स पँट घालूनही वारी करता येते हेच या कलाकार मंडळींनी सिध्द केले. या आधुनिक लाईव्‍ह बँडला प्रसिद्ध अभिनेते म‍िथुन चक्रवर्ती यांनी भरभरून दाद दिली. (Nagpur News)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाच्‍या समारोपाला कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘अभंग रिपोस्ट’ हा लाईव्ह बँड चा कार्यक्रम पार पडला.

मुख्य गायक प्रतिश म्हस्के, दुष्यंत देवरुखकर (ड्रम), स्वप्नील तरपे (बास गिटार), अजय वव्हाळ (गिटार), तुषार तोतरे (हार्मोनियम), रोशन आडे (तबला) या युवकांनी तरुण पिढीपर्यंत आपले अभंग पोहचविण्यासाठी या बँडची स्थापना केली. संत परंपरेतील अभिजात जुन्या अभंगाला आधुनिक नवसंगीताचा साज चढवून हा अनमोल नजराणा रसिक दरबारी पेश केला. या फ्युजन अभिव्यक्तीने उपस्थित विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठलचा गजर सभागृहात उमटला आणि लहानपण देगा देवा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, देह देवाचे मंदिर, कशाला काशी जातो रे बाबा , चंदनाचे हात, चल ग सखे पंढरीला, आम्ही बी घडलो या अभंगांच्या मंत्रमुग्ध सादरीकरणाने अतिशय वेगळ्या स्वॅग असणार्‍या या गायकांनी उपस्थितांना गायनात सामावून घेतले. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट आणि वन्स मोअरचे स्वर सतत सभागृहात निनादत होते.

स्वप्न साकार करा - मिथुन चक्रवर्ती

स्वप्नांना अव्हेरू नका, ते सफल होण्यासाठीच पडत असतात. अंतर्मन कधीही खोटी साक्ष देत नाही, तेव्हा आतला आवाज ऐकून ध्येयपथावर मार्गक्रमण करा, असे प्रतिपादन पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ता मेघे, उपाध्यक्ष अशोक मानकर, एलआयसीचे माजी महाव्यवस्थापक निलेश साठे, प्रतापसिंग चव्हाण, डॉ. संजय उगेमुगे, नारायण समर्थ आणि अविनाश घुशे यांची उपस्थिती होती.

ग.त्र्यं. माडखोलकरांचे स्‍मारक व्‍हावे : सुधीर पाठक

याप्रसंगी ज्‍येष्‍ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्‍येष्‍ठ पत्रकार सुधीर पाठक यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुधीर पाठक यांनी, ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या सिंहासनावर बसायची मला संधी मिळाली. माडखोलकरांचे नागपूर येथे स्मारक व्हावे व शहरातील पत्रकारितेचा गौरव करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 Nagpur  cultural festival
नागपूर | अवाढव्य रोड ट्रेनला गडकरींची हिरवी झेंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news