Meditrina Hospital Case | मेडिट्रिना हॉस्पीटल प्रकरण : डॉ. समीर पालटेवारसह १३ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Nagpur News | संशयित आरोपींनी मोठ्या प्रमाणात निधी स्वीकारून अपहार केल्याचा ठपका
Nagpur  Meditrina Hospital case
मेडिट्रिना हॉस्पीटल प्रकरण(Puhari Photo)
Published on
Updated on

Dr Sameer Paltewar bail rejected

नागपूर: मेडिट्रिना हॉस्पीटल प्रकरणी डॉ. समीर नारायण पालटेवार आणि इतर १३ आरोपींचा कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील अटकपूर्व जामिनाचा अंतरिम अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश, यांनी फेटाळला आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपींनी मोठ्या प्रमाणात निधी स्वीकारून त्याचा अपहार केला असून, दस्तऐवज बनावट करण्यासह गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. तपास सुरू असल्याने आणि आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे या टप्प्यावर अटकपूर्व संरक्षण देणे योग्य ठरणार नाही.

Nagpur  Meditrina Hospital case
Nagpur NCP | ...मग चिंतन काय कामाचे ? अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजी; नागपूर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

दरम्यान, १७ सप्टेंबर २०२५ रोजी आर्थिक गुन्हे शाखेने सीताबर्डी पोलिसांतर्फे डॉ. पालटेवार, त्यांची पत्नी सोनाली आणि इतर १६ जणांविरुद्ध रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलमधील मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाचवा गुन्हा नोंदविला आहे. रुग्णालयाचे सह-संस्थापक गणेश चक्करवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, २०२० ते २०२४ या कालावधीत खोट्या कन्सल्टन्सी व मार्केटिंग बिलांच्या माध्यमातून तब्बल १६.८३ कोटींचा निधी वळविण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय, नागपूर महानगरपालिकेने विविध नियमभंग प्रकरणी या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. अग्निशमन विभागाने अग्निसुरक्षेच्या साधनांचा अभाव असल्यामुळे रुग्णालय असुरक्षित ठरविले असून, आरोग्य विभागाने हॉस्पिटलचे आयपीडी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया देखील हाती घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news