Nagpur Crime | सासरच्यांनी हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याचा आरोप: बेंगळुरू येथील तरुणाने जीवन संपविले, आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज

सुरजची पत्नी गनावीचा बेंगळुरूमध्ये गुरुवारी जीवन संपविण्याच प्रयत्न
  Nagpur Dowry Harassment allegations
सुरज, जयंतीPudhari
Published on
Updated on

Nagpur Dowry Harassment allegations

नागपूर : नागपूरमधील एका हॅाटेलमध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला, तर आई गंभीर आहे. रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज असून दोघेही बेंगळुरू येथील रहिवासी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरजचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. सुरजची पत्नी गनावीने बेंगळुरूमध्ये गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करीत या मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बेंगलूरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर जोरदार आंदोलन केले. बेंगलूरूमध्ये हे आंदोलन,कारवाईसाठी दडपण सुरु असताना आई आणि मुलगा भीतीपोटी नागपुरात दाखल झाले.

  Nagpur Dowry Harassment allegations
Nagpur Municipal Election | नागपूर महापालिका निवडणूक : महायुतीत भाजप पाठोपाठ शिवसेनाही घेणार मुलाखती

मानसिक विवंचनतेच दोघांनीही स्थानिक हॅाटेल रॉयल वीलामध्ये मुक्काम केला आणि याच हॉटेलमध्ये दोघांनीही मध्यरात्री गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला.सोनेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल रॉयल वीला येथे ही घटना घडली. मृतक तरुणाचे नाव सुरज शिवन्ना वय 30 वर्षे असे असून जयंती रामकृष्ण आप्पा वय 60 वर्षे असे आईचे नाव आहे. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या दोघांनीही गळफास घेतला. मुलाचा मृत्यू झाला. हॉटेल व्यवस्थापनाने सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सूरजचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news