Nagpur Crime | 'तुझा मर्डर करीन अन् पाय तोडीन': वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकाला जीवे मारण्याची धमकी

जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nagpur electricity bill recovery dispute
सहायक अभियंत्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. Pudhari
Published on
Updated on

Nagpur electricity bill recovery dispute

नागपूर: थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका ग्राहकाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास दयानंद पार्क परिसरातील 'टी लवर शॉप' समोर घडली.

महावितरणच्या सिव्हिल लाईन उपविभागाचे सहायक अभियंता विनय गोंधुळे हे रुपक उपथडे, मोरेश्वर पटले, सोनाली वाघमारे, अजय कनोजीया, पंकज वरकडे, अजय मोर्य, रोशन रणदिवे, प्रविण नितनवरे, राजकुमारी मरसकुले, दर्शना गुरुमुळे, अपेक्षा बहादुरे, ताराचंद दुबे, या आपल्या पथकासह जरीपटका परिसरात थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत होते. दयानंद पार्क गार्डनजवळ असलेल्या 'टी लवर शॉप'चे मालक रणबीर सिंग इकबाल सिंग यांच्याकडे मागील पाच महिन्यांपासून 22,600 रुपयांची वीज देयके थकीत होती.

Nagpur electricity bill recovery dispute
Nagpur Bomb Threat | नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी दुकानात उपस्थित महिलेला देयक भरण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही प्रतिसाद न मिळाल्याने नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला. वीज पुरवठा खंडित केल्याचा राग धरून आरोपी रणबीर सिंग (वय 33 वर्ष, रा. दीक्षित नगर) याने घटनास्थळी येऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. अश्लील भाषेत शिवीगाळ केली. "कोणालाही 10 लाख रुपये देऊन तुझा मर्डर करीन आणि पाय तोडीन," अशी धमकी त्याने तंत्रज्ञ रुपक उपथडे यांना दिली. इतकेच नव्हे तर पथकातील महिला कर्मचारी आणि कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझेले यांनाही अपमानास्पद वागणूक देत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर सहायक अभियंत्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत तायडे यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत आरोपी रणबीर सिंग इकबाल सिंग विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news