

Gandhi Gate 9 Suspects Granted Bail
नागपूर: नागपुरातील महाल गांधी गेट परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर उसळलेल्या हिंसाचार जाळपोळ प्रकरणी नऊ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. दोन गटांत दगडफेक, हिंसाचाराची घटना १७ मार्च रोजी घडली होती.
आज (दि.२५) उच्च न्यायालयाने नागपुरातील या दंगलसदृश्य परिस्थिती, हिंसाचारा संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध जनमत याचिकांची सुनावणी करताना संबंधित नऊ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. ज्या नऊ जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये इकबाल अन्सारी, एजाज अन्सारी, अबसार अन्सारी, इजहार अन्सारी, अशफाकउल्ला अमीन उल्लाह, मुझमील अन्सारी, मोहम्मद राहील, मोहम्मद यासिर, इफ्तिकार अन्सारी यांचा समावेश आहे.
आरोपीतर्फे अॅड. असीफ कुरैशी, श्रीरंग भांडारकर, रफ़ीक अकबानी, आदिल मोहम्मद, नावेद ओपाई व आदिल शेख यांनी युक्तिवाद केला. कुठलाही व्यक्ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असतो. हेच या निकालाने सिद्ध केल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने न्यायालयाबाहेर समर्थकांनी व्यक्त केली.