Nagpur crime news
नागपूर: प्रियकराची लग्नानंतर पतीच्या मदतीने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा शिवारातील घडली आहे. गुरुवारी (दि.५) भरदिवसा रस्त्याच्या कडेला केलेल्या या खुनाच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सागर वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राजू आणि सोनाली गजभिये या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सोनाली गजभिये हिचे लग्नापूर्वी सागर वानखेडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र सोनाही हिचा विवाह राजू गजभिये याच्याशी झाला. लग्नानंतर सागर हा या जोडप्याला वारंवार त्रास देत होता, या रागातून पती-पत्नीने त्याची चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना दिवसा रस्त्याच्या कडेला नागरिकांसमोर घडली. अनेक वाहनधारकांनी या घटनेचा व्हिडिओ केला. पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.