

Kalmeshwar Youth Assault Case
नागपूर : कळमेश्वर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आरोपप्रत्यारोपांनी ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधून प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, विशिष्ठ राजकीय पक्षाचा प्रचार करण्यावरून राडा झाला. एकाचे अपहरण करत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
तू काँग्रेससाठी काम का करत नाहीस आणि भाजपला का पाठिंबा देत आहेस?, असा सवाल करीत ही मारहाण केल्याचा आरोप आहे. आरिफ लतिफ शेख (वय ४१, कळमेश्वर) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. जखमीकडून नागपुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
आरिफला कळमेश्वर भागात मारहाण करीत कारमध्ये बसविले आणि नागपूरच्या दिशेने नेत मारहाण करून सोडून दिले होते.या प्रकरणी तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी तक्रारीवरून तपास सुरू केला आहे.