Nagpur jewellers extortion letters | बिश्नोई गँगकडून सराफ व्यावसायिकांना खंडणीची पत्रे? व्यावसायिकांमध्ये खळबळ

बिश्नोई गँगकडून सराफ व्यावसायिकांना खंडणीची पत्रे? व्यावसायिकांमध्ये खळबळ
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

नागपूर - कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील सराफ व्यावसायिकांना 10 लाख रुपये खंडणीची मागणी करणारी पत्रे नागपुरातील खामला, त्रिमुर्ती नगर पोस्टातून टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिस आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती कुणी पोस्ट केली याचा तपास करत आहेत. या पत्रानंतर उपराजधानीत व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

व्यापाऱ्यांची बैठक झाली. पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दोन उपायुक्तांच्या नेतृत्वात सात पथके स्थापन केली. यासंदर्भात पोलिस उपायुक्त राहुल मदने यांची या सराफ व्यावसायिकांनी त्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर भेट घेतली. दिवाळीचे दिवस असताना कुणाला 8 दिवसात कुणाला 10 दिवसात ही रक्कम तयार ठेवण्यास सांगितले आहे. याबाबतीत तातडीने सराफ बाजारात पोलिस बंदोबस्त केला जावा, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली.

याबाबतीत पोलिस तपास सुरी आहे. कुणीही घाबरू नका, असा विश्वास यावेळी मदने यांनी दिला. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग कडून ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपुरातील 8 सराफा व्यावसायिकांना 10 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याने उपराजधानीत खळबळ माजली आहे. आज यासंदर्भात पोलिस उपायुक्त राहुल मदने यांची या सराफा व्यावसायिकांनी भेट घेतली. दिवाळीचे दिवस दुकानात ग्राहकांची गर्दी असताना कुणाला 8 दिवसात कुणाला 10 दिवसात ही रक्कम तयार ठेवण्यास सांगितले आहे. याबाबतीत तातडीने सराफ बाजारात पोलिस बंदोबस्त केला जावा अशी मागणी या व्यावसायिकांनी केली.

Crime News
Nagpur Nazul Land | नागपूर-अमरावती विभागातील नझुल जमीनधारकांना मोठा दिलासा: फ्री-होल्ड, थकीत भाडे व शर्तभंग नियमितीकरण होणार

दुर्गा ज्वेलर्सचे मालक सराफा व्यावसायिक नेहाल तिनखेडे (वय 31, रा. नंदनवन) यांच्या तक्रारीवरून गांधीबाग तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 31 ऑक्टोबरला त्यांना इतवारी पोस्टातून पत्र आले. यात तीन दिवसात 10 लाख रुपये तयार ठेवा, आम्ही बिश्नोई टोळीतील सदस्य आहोत. अन्यथा गळा कापून मारून टाकू असा इशारा दिला गेला. यानंतर त्यांनी लगेच सराफा असोसीएशनकडे धाव घेतली. यावेळी इतरही व्यावसायिकांना अशी धमकी पत्रे आल्याचे पुढे आले.

Crime News
Nagpur News | २०० हिमालयीन मोहिमा फत्ते करणारे साहसी गिर्यारोहक अविनाश देऊस्कर यांचे निधन!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.