Nagpur Gas Supply | नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक, निवासी वसाहतींचा 30 जूननंतर गॅस पुरवठा बंद

३० जूनपर्यंत पाइप नैसर्गिक वायू म्हणजेच पीएनजी कनेक्शन घेणे बंधनकारक
Gas supply through pipeline
Gas supply through pipeline : File Photo
Published on
Updated on

Nagpur Residential Industrial Gas Supply Shutdown

नागपूर : नागपूर जिल्ह्यात विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व औद्योगिक युनिट्सना आता येत्या ३० जूनपर्यंत पाइप नैसर्गिक वायू म्हणजेच पीएनजी कनेक्शन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीनंतर औद्योगिक तसेच निवासी वसाहतींमधील गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला जाणार आहे.

ज्या भागात पाइपलाइनचे जाळे उपलब्ध आहे, तिथे ३० जूननंतर औद्योगिक वापरासाठी एकही सिलिंडर दिले जाणार नाही. अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नुकतेच यासंदर्भात सूतोवाच केले होते. एमआयडीसी क्षेत्रातील कामगारांची निवासस्थाने आणि इतर घरगुती ग्राहकांसाठीचा सिलिंडर पुरवठाही बंद केला जाणार आहे.राज्य शासनाच्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्कच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनने (एमआयए) सर्व सदस्य उद्योजकांना हे आवाहन करण्यात आले आहे.

Gas supply through pipeline
Child Marriage Nagpur | 35 वर्षांचा नवरोबा, 15 वर्षांची नवरी : प्रशासनाने रोखला बालविवाह

सध्या औद्योगिक क्षेत्रात जाणवणारी एलपीजीची टंचाई आणि भविष्यातील इंधनाची सुरक्षितता लक्षात घेता शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी आता एजन्सींना वेगळ्या परवानगीची वाट पाहावी लागणार नाही. अर्जानंतर २४ तासांत मंजुरी गृहीत धरली जाईल. अंमलबजावणीची ठरवण्यासाठी कार्यपद्धती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, प्रादेशिक अधिकारी आणि हरियाणा सिटी गॅस (एचसीजी) यांच्यात वरिष्ठ स्तरावर बैठकीत पुढील धोरण ठरविले जाणार आहे.

एमआयएने सर्व सदस्यांना तातडीने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यांच्या खोदकामामुळे होणारे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी संबंधित गॅस एजन्सीची राहणार आहे. हा बदल पर्यावरणाच्या आणि उद्योगांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून उत्पादन प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये, यासाठी सर्व उद्योजकांनी मुदतीच्या आत पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज करावा, असे आवाहन एमआयएचे अध्यक्ष पी. मोहन यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news