HMPV Virus | चिनी व्हायरसची नागपुरात दोघांना लागण

देशात पाच जणांना ह्युमन मेटान्युमिनो विषाणूचा संसर्ग
HMPV Virus Case
HMPV | चिनी व्हायरसची नागपुरात दोघांना लागणPudhari File Photo
Published on
Updated on

नागपूर : HMPV Virus | नागपुरात दोघांना बहुचर्चित ह्युमन मेटान्युमिनो विषाणूचा (एचएमपीव्ही) संसर्ग झाला असल्याची माहिती मिळत आहे. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला आहे. ७ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा रिपोर्ट ३ जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला. या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती आहे.

देशात व्हायरसची पाचजणांना लागण

देशात सहा बाळांना बहुचर्चित ह्युमन मेटान्युमिनो विषाणूचा (एचएमपीव्ही) संसर्ग झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. त्यात कर्नाटकातील दोन, गुजरातमधील एक, तामिळनाडूतील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच हा विषाणू काही नवीन नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आले आहे. श्वसनाच्या विकाराशी संबंधित रुग्णांवर नियमित देखरेख ठेवण्यात येते. त्यात हे रुग्ण आढळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news