Nylon Manja Seized Nagpur | नागपुरात नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त; ७८ चकऱ्यांसह १.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

विक्रीच्या उद्देशाने साठा करणाऱ्या फैजान अख्तर विरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur  Banned Nylon Manja Stock
Nagpur Banned Nylon Manja StockPudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Banned Nylon Manja Stock

नागपूर :  नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही शहरात त्याची छुप्या पद्धतीने विक्री करीत असताना नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्सार नगर परिसरात छापेमारी करून नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत विविध कंपन्यांच्या तब्बल ७८ चकऱ्या हस्तगत करण्यात आल्या असून, जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख २८ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी फैजान अख्तर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.१० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. अन्सार नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी फैजान अख्तर (वय 30, रा. अन्सार नगर, मोमीनपुरा, नागपूर) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या विविध कंपन्यांच्या ७८ चकऱ्या आढळून आल्या. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.

Nagpur  Banned Nylon Manja Stock
Nagpur Murder Mystery : कुख्यात पलाश वासनिक हत्याकांडाचा पर्दाफाश! बहिणीचा संसार उद्ध्वस्त केल्याचा राग; मेहुण्याचा काटा काढला

 गोंदियातील व्यक्तीचाही शोध सुरू

या प्रकरणात गोंदिया येथील मनोज कुमार रेड्डी याचाही सहभाग असल्याच्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असून, त्याचा शोध घेतला जात आहे. जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपीला पुढील तपासासाठी तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.