Nagpur Hit and Run | अजनीत ‘हिट अँड रन’, दोन तरुणांचा मृत्यू

दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली
Nagpur Hit and Run
नागपूर : दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली.(File Photo)
Published on
Updated on

Nagpur Hit and Run

नागपूर : कॅटरिंगचे काम आटोपून दुचाकीने घरी परतत असलेल्या दोन तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वर नगर गेट जवळील दुभाजक वळणावर मध्यरात्री हा अपघात झाला. नितीन राजेंद्र कटरे (१८) आणि कोमल भगवती यादव (१७, दोन्ही रा. बालाजीनगर, कळमना) अशी अपघातातील मृतकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि कोमल हे दोघेही कॅटरिंगची कामे करत होते. गुरूवार, ५ जून रोजी कॅटरिंगची कामे आटोपून दोघेही एमएच ४९ / सीपी ०४८२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने भरधाव घरी परत जात होते. मध्यरात्री रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने इतर वाहनाकडे लक्ष नसल्याने भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. दोघेही युवक त्यांच्या दुचाकीवरून उसळून रस्त्यावर आपटले. रक्ताच्या थारोळ्यातच दोघांचा मृत्यू झाला.

Nagpur Hit and Run
Nagpur MD Drug Racket | घरातूनच अमली पदार्थांची विक्री; नागपुरात महिलेकडून एमडी तस्करी

या अपघातानंतर चालक पिकअप वाहनासह पळून गेला. दोन्ही तरुणांना मेडिकल येथे दाखल केले असता असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी राजेंद्र्र बद्रीलाल कटरे (४२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पटले यांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Hit and Run
Nagpur Bomb Threat | नागपुरातील सीजीओ कॉम्प्लेक्स उडवून देण्याच्या धमकीनंतर पोलिसांची तारांबळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news