नागपूर हिट अँड रन प्रकरण : ४ वर्षीय हसीनाचाही मेडिकल रुग्णालयात मृत्यू

नागपूर हिट अँड रन प्रकरण : ४ वर्षीय हसीनाचाही मेडिकल रुग्णालयात मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिघोरी टोल नाक्याजवळ सोमवारी मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या ९ जणांना एका मद्यधुंद कारचालकाने उडविल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. आज जखमींपैकी ४ वर्षीय हसीना या चिमुकलीचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या ३ झाली आहे. या अपघातातील इतर ६ जण गंभीर जखमी आहेत.

आरोपींना अभय; ठाणेदार निलंबित

ही कार चालक भूषण लांजेवार (वय २० रा. दिघोरी) हा तरुण चालवित होता. पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपातून आरोपींना अभय दिल्याच्या आरोपातून ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे वाठोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय दिघे यांना पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.

मृत्यूशी चार दिवसांपासूनची झुंज अखेर संपली

सोमवारी मध्यरात्री दिघोरी नाका चौकात वाढदिवसाची पार्टी करून येणाऱ्या मद्यधुंद विद्यार्थ्याने भरधाव कार फूटपाथवर चढवून फुटपाथवर झोपी गेलेल्यांना चिरडले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार मागे-पुढे घेतल्याने हे जखमी अधिकच गंभीर झाले. या अपघातात कांतीबाई गजुड बागडिया (वय ४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (वय ३०) हे दोघे ठार झाले. तर कविता बागडिया (वय २८), बुलको बागडीया (वय ८), हसीना बागडीया (वय ४), सकीना बागडीया (दिड वर्ष), हनुमान बागडीया (वय ३५), विक्रम उर्फ भूषा (वय १०) आणि पानबाई (वय १५) हे गंभीर जखमी झाले. हसीना या चिमुकलीवर मेडिकल रुग्णालयात ट्रामा आयसीयू २ मध्ये उपचार सुरू होते. रात्री कारडीओ अरेस्टने प्रकृती चिंताजनक झाल्याने कृत्रिम श्वसनयंत्रणेवर तिला ठेवले गेले मात्र मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news