

Nagpur Hingna leopard poaching
नागपूर : जिल्हयातील हिंगणा तालुक्यातील मौजा भिवकुंड येथे बिबट्याची शिकार करणाऱ्या तीन जणांना 12 डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र हिंगणा येथील पथकाकडून या तिघांना अटक करण्यात आली. वर्धा वन विभागाच्या मार्फत मिळालेल्या माहितीवर ही कारवाई करण्यात आली.
हिंगणा तालुक्यातील मोजा भीमकुंड येथे 9 डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती एस जी कर्णासे व पथकाने केलेल्या तपासणीत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून हत्यार व इतर पुरावेही जप्त करण्यात आले. यानंतर वन विभागाने माहितीच्या आधारे दुसऱ्या संशयितास बुटीबोरी येथून तर तिसऱ्या संशयितास भिवापूर तालुक्यातील मौजा खंडाळझरी येथून रात्री अटक केली.
या तिघांना सेलू येथील न्यायालयात हजर केले असता 12 डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली. उपवनसंरक्षक डॉ विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली यश काळे,शितल कर्णासे यांचे सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.