TET Cutoff Condition: शिक्षकांना मोठा दिलासा! पदोन्नतीसाठी टीईटी कट-ऑफची अट रद्द; नागपूर खंडपीठचा महत्वाचा निर्णय

TET Cutoff Condition
TET Cutoff Conditionpudhari
Published on
Updated on

TET Cutoff Condition: राज्यातील शिक्षकांना नागपूर खंडपीठानं मोठा दिलासा दिला आहे. शिक्षक पदोन्नतीसाठी टीईटी कट ऑफची अट रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठानं दिला आहे. १ सप्टेंबरपर्यंत टीईटी उत्तीर्ण असणाऱ्याची अट बेकायदेशीर असल्याचं म्हणत खंडपीठाने १४ मे २०२६ चे परिपत्रक रद्द केले आहे.

TET Cutoff Condition
Sambhajinagar News : जि.प. शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

न्यायालयाने पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना टीईटी पात्रता असणे हाच एक निकष असल्याचं मत नोंदवलं तर पूर्वनिश्चित कट ऑफची तारीख लावण्याचा अधिकार हा प्रशासनाला नाही. राज्य सरकारला याबाबत नवीन शासन आदेश आणि एकसमान पदोन्नती धोरण तयार करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

TET Cutoff Condition
Ratnagiri News : अंतिम मान्यता नसतानाही २००८ पासून रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू; विधान परिषदेत धक्कादायक खुलासा

उच्च न्यायालायने टीईटी पात्रतेमुळं शिक्षकांची ज्येष्ठता बदलत नाही. ज्येष्ठता आणि पदोन्नतीची पात्रता या स्वतंत्र बाबी आहेत असं देखील उच्च न्यायालायनं सांगितलं. कनिष्ठाला ज्येष्ठाच्या पुढे ठेवता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आधी पूर्ण झालेल्या पदोन्न्ती प्रक्रियेवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही असं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news