Nitesh Karale Nagpur MLC Election: प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नसते... कराळे मास्तर 'हार कर भी' नागपूरचे बाजीगर

माझ्या मागे कोणती संघटना नाही मात्र तरी देखील मी दोन राष्ट्रीय पक्षांच्या नाका तोंडात पाणी जाईपर्यंत घाईला आणलं आहे.
Nitesh Karale Nagpur MLC Election
Nitesh Karale Nagpur MLC Electionpudhari
Published on: 
Updated on: 

Nitesh Karale Nagpur MLC Election: नागपूर पदवीधर मतदार संघातील मतमोजणी आता निर्णायक आणि रंजक स्थितीत पोहचली आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यामुळं आता दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहे. इथं पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मात्र या निवडणुकीत अपक्ष शड्डू ठोकणारे नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर यांनी सर्वांनाच घाम फोडला आहे. आता त्यांना मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर नागपूरचा पदवीधर आमदार ठरणार आहे.

Nitesh Karale Nagpur MLC Election
Nitesh Karale | नितेश कराळे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी!

दिलेल्या प्रेमाबद्दल आभार

याबाबत पुढारी न्यूजशी बोलताना नितेश कराळे म्हणाले, 'अनेकांची इच्छा होती की कराळे मास्त र निवडून आले पाहिजेत. माझ्या मागे कोणती संघटना नाही मात्र तरी देखील मी दोन राष्ट्रीय पक्षांच्या नाका तोंडात पाणी जाईपर्यंत घाईला आणलं आहे. त्यांना चागंलाच घाम फोडला आहे.

कराळे पुढे म्हणाले, मला २५ हजार मते मिळाली आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. हे सर्व निष्ठावंत लोक आहेत. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. ज्या लोकांनी मला मतं दिली, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

Nitesh Karale Nagpur MLC Election
Nitesh Karale: राजकारणात खळबळ! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितेश कराळे पोलिसांच्या ताब्यात; 'त्या' व्हिडिओमुळे आले अडचणीत

माझी मते बिनपैशाची

कराळे मास्तरांनी प्रतिक्रिया देताना यंदाच्या निवडणुकीत झालेला पैशाचा वापर याबाबत देखील टोमणा मारला. त्यांनी मला मिळालेले २५ हजारांची मते ही बिना पैशाचे मतदान आहे. आता मला मिळालेली ही २५ हजार मते निर्णायक ठरणार आहेत. आताची जी परिस्थिती आहे. त्यात कोहळे आणि वंजारी यांच्यात चुसर आहे. यात माझ्या २५ हजार मतदानातील दुसऱ्या पसंतीची मते कोणाला मिळणार यावर सर्व ठरणार आहे.

कोहळे यांना चार हजारांची आघाडी आहे. वंजारींना पहिला ही चार हजार मते मायनस करावी लागतील अन् नंतर लीड घ्यावे लागेल. मला असं वाटतं की मला मिळालेल्या मतांमध्ये दुसऱ्या पसंती ही अभिजीत वंजारी यांना जास्त असेल. कोहळे कमी असतील. निवडणुकीचा निकाल हा फक्त ४०० ते ५०० मतांवर ठरेल.

Nitesh Karale Nagpur MLC Election
Harshvardhan Sapkal on Datta Karale: डीआयजी दत्ता कराळे यांच्या कृपेने महाराष्ट्रात बोगस कॉल सेंटर; काँग्रेसचे सपकाळ यांचा आरोप

प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नाही...

कराळे मास्तरांनी प्रत्येक लढाई ही जिंकण्यासाठी लढायची नसते तर आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी लढायची असते. ही निवडणूक माझ्या अस्तित्वासाठी होती. म्हणून मी फॉर्म भरला. माझा फॉर्म मुलांनी भरला मुलांनी प्रेम केलं. त्यांनी माझ्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं.

भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत काय करायचं याचा काही दिवसात निर्णय घेणार असे म्हणत कराळे मास्तरांनी आपलं पुढचं पाऊल काय असेल याचा अंदाज दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news