Nagpur Garage Fire: मालकाने नोकरीतून काढलं, कर्मचाऱ्याने थेट गॅरेजलाच आग लावली; २० दुचाकी जळून खाक, VIDEO समोर

Nagpur Garage Fire: नागपुरात नोकरीवरून काढल्याच्या रागातून कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजला आग लावल्याचा आरोप आहे.
Nagpur Garage Fire
Nagpur Garage FirePudhari
Published on: 
Updated on: 

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून एका कर्मचाऱ्याने मालकाच्या गॅरेजला आग लावल्याची घटना घडली आहे. नागपुरातील कपिल नगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत गॅरेजमध्ये असलेल्या सुमारे २० दुचाकी जळून खाक झाल्या. आग इतकी भीषण होती की शेजारी असलेले एका डॉक्टरांचे क्लिनिकही आगीच्या तडाख्यात सापडले. या घटनेत २० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही घटना कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात घडली. या ठिकाणी सतीश यादव यांचे ‘दिवेश होंडा सर्विस’ नावाचे गॅरेज आहे. राजू महेंद्रकर हा तरुण याच गॅरेजमध्ये पूर्वी काम करत होता. मात्र, सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राजूला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गॅरेज मालक सतीश यादव यांनी त्याला कामावरून काढले होते. नोकरी गेल्यापासून राजू नाराज होता, अशी माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास राजू गॅरेजजवळ आल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने गॅरेजमध्ये आग लावल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या बाइक आणि स्कूटर आगीत राख झाल्या.

Nagpur Garage Fire
Gold Silver Price Today: सणासुदीपूर्वी सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, चांदीही महागली; आज 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेजारील डॉक्टरांचे क्लिनिकही आगीच्या तडाख्यात आले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

Nagpur Garage Fire
Sahil Wakode Case: आयआयटी मुंबईत विद्यार्थ्यांचे उपोषण सुरु; तीन आठवड्यांनंतरही ठोस निर्णय नाही

दरम्यान, या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती गॅरेजच्या परिसरात फिरताना दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आग नेमकी कशी लागली, याचाही तपास सुरू आहे.

या आगीमध्ये गॅरेजमधील सुमारे २० दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच शेजारील क्लिनिकचेही नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेत २० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कपिल नगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून CCTV फुटेजसह इतर पुरावे तपासले जात आहेत. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news