Nagpur Haj Flights | नागपूर येथून हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिलला होणार रवाना

नागपूर व परिसरातील 1 हजार 700 यात्रेकरूंचा समावेश
First Haj flight from Nagpur
विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेदरी Pudhari
Published on
Updated on

First Haj flight from Nagpur

नागपूर : हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना यावेळी स्मार्ट वॉच दिले जाणार असून नागपुरातून पहिले विमान 24 एप्रिलला उड्डाण घेणार आहे. नागपूर येथून जाणाऱ्या यात्रेकरुची राज्य हज समितीमार्फत गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेदरी यांनी आज (दि. १६) दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिनांक 24 एप्रिलपासून हज यात्रेला सुरुवात होत आहे. नागपूर व परिसरातील 1हजार 700 यात्रेकरूचा समावेश राहणार आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून छत्तीसगड , मध्य प्रदेश आदी राज्यातील सुमारे 19 हजार 335 यात्रेकरू हजसाठी रवाना होणार आहेत. दररोज विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

First Haj flight from Nagpur
Nagpur Congress | काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार : नेत्यांच्या गटबाजीने उपराजधानीत वातावरण तापले

प्रत्येक यात्रेकरूंना स्मार्ट वॉच देण्यात येणार असून या वॉचमुळे यात्रेत यात्रेकरूंची नेमकी उपस्थिती, काही वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास त्याबाबतची माहिती तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय या संदर्भातील माहिती नियंत्रण कक्षाकडे कळू शकेल.

या बैठकीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त तेजूसिंग पवार, अतिरिक्त महापालिका आयुक्त अंकित हज समितीचे कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, राज्य हज समितीच्या श्रीमती खादीजा नाईकवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, परिमंडळ क्रमांक तीन चे पोलीस उपायुक्त राहुल मदने नासुप्रच्या महा व्यवस्थापक प्रियदर्शनी बोरकर महापालिकेचे राजेश भगत यांच्यासह बीएसएनएल, रेल्वे, मिहान इंडिया लिमिटेडचे यशवंत सराटकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news