Nagpur Congress | काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार : नेत्यांच्या गटबाजीने उपराजधानीत वातावरण तापले

आमदार विकास ठाकरे - आमदार नितीन राऊत आमने सामने
Vikas Thakre vs Nitin Raut
Vikas Thakre vs Nitin RautPudhari
Published on
Updated on

Vikas Thakre vs Nitin Raut

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : काँग्रेसला लोकसभा,विधानसभा, मनपात सत्ता मिळू शकली नाही. आता एकीकडे काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या भाकरी फिरविण्याच्या तयारीत असताना नेत्यांच्या गटबाजीने उपराजधानीत वातावरण तापले आहे. शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी स्वीकृत सदस्यपदी आपला मुलगा केतन विकास ठाकरे आणि समर्थक अतुल कोटेचा यांना संधी दिल्याने माजी मंत्री आमदार नितीन राऊत नाराज झाले आहेत.

अध्यक्षपद देखील ठाकरे गट आपल्याकडे ठेवणार असल्याने त्यांच्या नाराजीत अधिक भर पडली आहे. दोनदा मला मुक्त करा असे म्हणून आ ठाकरे यांचा राजीनामा पक्षाने नाकारला. आता त्यांच्या जागी तब्बल 12 वर्षानंतर नवा अध्यक्ष कोण होणार यासंदर्भात उत्सुकता आहे.

Vikas Thakre vs Nitin Raut
Nagpur Congress | नागपुरात काँग्रेस भाकरी फिरविणार: विकास ठाकरेंच्या जागी नवा अध्यक्ष कोण?

ठाकरे समर्थक गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड अशी काही नावे चर्चेत आहेत. मात्र यातूनच मनपात स्वीकृत सदस्य म्हणूनही वर्णी लागण्याची शक्यता लक्षात घेता आमदार ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण? हे गुलदस्त्यात आहे. पक्ष निरीक्षक तीन दिवस नागपुरात तळ ठोकून असताना ठाकरे यांनाच पुन्हा अध्यक्ष करा अशी मागणी पुढे आल्याने वातावरण तापले. आ.राऊत यांना स्वतःचा मुलगा कुणाल राऊत याला शहर अध्यक्ष करायचे आहे. मात्र, सारेकाही ठाकरे गटाला मिळणार असेल तर आम्ही काय करणार, पक्षात राहून उपयोग काय, अशी भूमिका घेत आमदार नितीन राऊत राजीनाम्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा निहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून निरीक्षक अशोक यादव 15 एप्रिलनंतर पक्षाध्यक्ष यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. अध्यक्षपदाच्या बाबतीत आता ठाकरे गट, मुत्तेमवार गट पुन्हा वरचढ ठरणार की राऊत यांची नाराजी कायम राहणार की पक्षाकडून मनधरणी केली जाणार हे लवकरच उघड होणार आहे. तर दुसरीकडे नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्येही संघटन सृजन अभियान अंतर्गत अध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news