नागपूर : मूळची नागपूरची असलेली, कारगिलमधील शेवटच्या गावातून बेपत्ता झालेली महिला पाक पोलिसांच्या तपासात असून तिच्या एकाकी मुलाला आणण्यासाठी कुटुंबीय जाणार असल्याची माहिती कपिल नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली.
४ मे रोजी संत कबीर नगर येथील महिला सुनीता जामगडे या कोर्टाच्या कामाच्या निमित्ताने घरून पंजाबसाठी निघाल्या. जाताना सोबत आपल्या १२ वर्षीय मुलाला देखील घेऊन गेल्या. मात्र LOC कारगिल येथून सुनीता बेपत्ता झाल्या तर त्यांचा मुलगा कारगिल येथे आहे.
कुटुंबीयाकडे या संदर्भात चौकशी केली असता कुटुंबीय आज किंवा उद्या मुलाला घेण्यासाठी जाणार आहेत. सुनीता ही खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून आणि घरोघरी जाऊन कपडे विकायचे काम करतात अशी माहिती आहे. मागील ७ ते ८ वर्षापासून त्या पतीपासून विभक्त असून आईसोबत राहत होत्या. सुनीताचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांचा मुलगा सुरक्षित आहे. मात्र ती बेपत्ता आहे.