

Dikshabhoomi Nagpur President Controversy
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील गैरप्रकारांच्या चौकशी बैठकीदरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी असभ्य वर्तन केले. एका महिलेवर हात उगारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
समिती सदस्य विलास गजघाटे आणि दहा ते पंधरा महिलांनी माझा घेराव केला. शब्दांचा भडीमार केल्याने मी अस्वस्थ झालो. नेमकी हीच चित्रफित करून सोशल मीडियावर टाकण्यात आली. माझ्या बदनामीचा हा डाव असून याविरोधात बजाज नगर आणि जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे भंते ससाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, घाईघाईत विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी समितीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी ससाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. केवळ मौखिक तक्रारीवर चौकशी समिती गठित करण्यात आली. महाविद्यालयाची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
तर दुसरीकडे महिलांशी गैरवर्तन हे धम्म तत्व आहे काय? खरंच भंते शिलं सांभाळत आहेत की धम्म गुरू या नावाखाली हुकुमशाही करून दीक्षाभुमीवर मनमानी कारभार करतात. भंतेना दिक्षाभुमीचे अध्यक्ष राहण्याचा कोणताही अधिकार नाही. एका निस्वार्थ व्यक्तीस अध्यक्ष करा ही मागणी दुसऱ्या बाजूने पुढे आली आहे.