

नागपूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीची साक्ष देणारी पवित्र दीक्षाभूमी पुन्हा एकदा बुद्धवंदना आणि धम्माच्या मंगल स्वरांनी निनादली. देशाच्या कानाकोपर्यासह विदेशातून येणारे उपासक, उपासिका आणि अनुयायी तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारण्यासाठी येथे आले. आहेत. रविवार, १८ ऑक्टोबरपासून सुरू होणारा धम्मदीक्षेचा हा तीन दिवसीय सोहळा २० ऑक्टोबरपर्यंत सुरू होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या सहकार्याने हा उपक्रम अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी याबाबत माहिती दिली.
पहिल्या दिवशी रविवारला सकाळी ९.३० वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई बुद्धवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करतील. त्यानंतर उपासक केली. भिक्खू संघाकडून धम्मदीक्षा दिली गेली. प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.
या सोहळ्याला भंते नागसेन, भंते प्रज्ञाबोधी, भंते धम्मविजय, भंते महानागा, भंते कुमारकश्यप, भंते धम्मप्रकाश, भंते नागप्रकाश, भंते नागानंद, भंते धम्मपाल, भंते बुध्ददीप, भंते कुशीनागा, भंते अनुत्तरबोधी, यांच्यासह भिक्खू संघातील मान्यवर उपस्थित होते.
मानवमुक्तीच्या विचारांची प्रेरणाभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीची साक्षीदार असलेल्या दीक्षाभूमीला जगभरातील बौद्ध अनुयायांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागापासून देशातील विविध राज्यांतील हजारो अनुयायी दरवर्षी येथे येऊन धम्मदीक्षा ग्रहण करतात. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक स्थळ नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवमुक्तीच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे. येथून मिळणारी ऊर्जा अनुयायांच्या जीवनाला सकारात्मक दिशा देते, असे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी सांगितले.