Nagpur |अंबाझरी तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांना बुडताना वाचवले, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची कामगिरी

Nagpur |अंबाझरी तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांना बुडताना वाचवले, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची कामगिरी
Nagpur
अंबाझरी तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांना बुडताना वाचवले
Published on: 
Updated on: 

नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबाझरी तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल येथील एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असताना अंघोळीकरीता तलावात दोन युवक गेले होते. सुर्देश गोरखनाथ (अंदाजे वय 15 ते 16 वर्ष, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक) तसेच सिद्धीनाथ गोरखनाथ अंदाजे (वय 20 वर्षे, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक) हे दोन युवक बुडत असल्याचे समजले.

Nagpur
Shraddha Dubey arrested Nagpur : फरार मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर नागपुरमध्‍ये अटक; ११ दिवसांपासून पोलिसांना देत होती गुंगारा

लोकांचा बुडाले बुडाले असल्याचा आवाज येताच टीमने बोटीच्या साहाय्याने त्यांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.

Nagpur
Nagpur Graduate Constituency voting leave|खासगी आस्थापनांतील मतदारांना आता दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत

सिद्धनाथ गोरखनाथ हा शुद्धीत होता आणि सुर्देश गोरखनात यास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले आणि प्रथमोपचार देऊन त्याला शुद्धीत आणले व रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने त्यांना खासगी वाहनाने इंदिरा गांधी हॉस्पिटल (मेओ) येथे रवाना करण्यात आले.

पोलीस निरीक्षक जी. जी खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक आय डब्ल्यू रंदाई, एस पी बोंदर, एस. बी. मेंढे, लिंबा राठोड, सागर सदाफडे, गजानन पन्नासवार आदींनी यात पुढाकार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news