नागपूर : झाडाला लटकून ठेवलेल्या मृतदेहामुळे खळबळ

फ्रेंड्स कॉलनीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
Nagpur  Crime News
नागपूर येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ File Photo

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: नागपूर ते काटोल रोडवरील वर्दळीच्या पण गोरेवाडा जंगलामुळे झाडाझुडुपांच्या फ्रेंड्स कॉलनीत येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Nagpur  Crime News
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू दुसऱ्यांदा निलंबित

Summary

  • फ्रेंड्स कॉलनीत झाडाला लटकला मृतदेह आढळला

  • दोन दिवसानंतरही हा मृतदेह कुणाचा? उलगडा नाही

  • पोलिसांकडून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात

Nagpur  Crime News
नागपूर : आम्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत : डॉ. नितीन राऊत

दोन दिवसानंतरही हा मृतदेह कुणाचा? याविषयी मागोवा लागू शकलेला नाही. या तरुणाने या परिसरात जीवन संपविले की हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकवून ठेवण्यात आला, हे गूढ उकलण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.

Nagpur  Crime News
नागपूर : दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला फडणवीस यांची स्थगिती

पोलीस स्टेशनमधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात

स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या अहवालाकडे पोलिसांचे लक्ष आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news