

नागपूर: नागपूर पत्नीचे इतर पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याची कुण- कुण लागल्यापासून पती तिला वारंवार मारहाण करीत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कलार पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली मध्य प्रदेशातून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
किशोर सूर्यवंशी असे मृतक पतीचे नाव आहे तर सचिन कन्हैयालाल रायपुरे व 24 राहणार शिंदवाडा कौशल मधुसूदन रायपुरे वय 32 पियुष धर्मदास बघेल वय 20 अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेकोलीत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेल्या किशोरच्या पत्नीचे सचिनशी अनैतिक संबंध होते. ड्यूटी संपल्यावर ते मोटारसायकने घरी जात असताना त्यांना सचिन व दोघा तरुणांनी अडविले. त्याच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडून जखमी केले. जबर मारहाण करीत ते तिघेही पसार झाले. जखमी किशोरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुन्हे शाखा पोलिसांनी खुनाचा दाखल केला.