Nagpur Crime | सक्तीचे धर्मांतर, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा आरोप!

दोन आरोपींना अटक, एक पसार, एका विवाहित महिलेच्या आरोपानंतर खळबळ
Nagpur Crime
Nagpur Crimefile photo
Published on
Updated on

नागपूर : नागपूर  सोनेगाव परिसरात एका विवाहित महिलेने सक्तीचे धर्मांतर, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक खंडणीचे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप पसार आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या माजी वर्गमित्राने विश्वास संपादन करून तिला गुंगीचे द्रव्य दिले आणि हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचा त्याने आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि नंतर त्या माध्यमातून तिला सतत ब्लॅकमेल करून शोषण केले.

पीडित महिलेने तक्रारीत पुढे नमूद करण्यात केले आहे की, आरोपींनी तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला तसेच विविध कारणांनी तिच्याकडून तीन लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली. काही धार्मिक आणि तथाकथित तांत्रिक विधींच्या नावाखाली मानसिक छळ केला. या प्रकरणात पोलिसांनी अय्याज ताज मदारे आणि अमीन शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही कळमेश्वर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर हजरत मौलाना नावाचा आरोपी सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सोनेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार, धर्मांतरासाठी दबाव टाकणे, खंडणी तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून मोबाईल चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news