Nagpur Crime | नागपुरात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार 

कपिलनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक
rape case
rape case
Published on
Updated on

नागपूर :नागपुरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटी असलेल्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीची आई उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी विद्यार्थिनी घरात एकटी असताना आरोपी सूरज मडके याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर विद्यार्थिनीने आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली

आरोपीविरुद्ध बलात्कार तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news