Nagpur Crime | बनावट देशी - विदेशी दारुचा कारखाना पकडला
Nagpur Crime | बनावट देशी - विदेशी दारुचा कारखाना पकडला

Nagpur Crime | बनावट देशी - विदेशी दारुचा कारखाना पकडला, 24 लाखाचा माल जप्त, गोंडवाना पिंपरीत धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाची कारवाई
Published on

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने गोंडवाना पिंपरी, हिंगणा परिसरातील माय टाऊन सोसायटी, सेक्टर-8 येथील बंगलो क्रमांक 133 येथे छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारुच्या कारखान्याला टाळे ठोकले.

घटनास्थळावरुन 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा व्हीस्कीच्या 356 बाटल्या, 90 बिएल बनावट देशी दारु, इलेक्ट्रानिक बॉटल सिलींग मशिन बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टग विदेशी दारुचे जीवंत प्लॉस्टीक जीवंत बुचे, चारचाकी वाहन असा एकूण 24 लाख 67 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Nagpur Crime | बनावट देशी - विदेशी दारुचा कारखाना पकडला
Nagpur Crime |पंखे, कुलर, ब्लँकेटच्या आड सुरु होती गांजाची तस्करी : सावनेरच्या टोलनाक्यावर 2.5 कोटीचा गांजा जप्त

यातील मुख्य आरोपी शुभम गोविंद तिवारी वय 31 वर्षे फरार असून गोविंद रामदत्त तिवारी वय 59, शैलेंद्र धुर्वे वय 24, रघुनाथ उईके वय 21, राजकुमार उईके वय 25, द्वारका शिवलाल इनवाती वय 45 व प्रमोद नथ्थुजी सयाम वय 42 या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे, निरीक्षक बालाजी चाळणेवार, दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण, अमित क्षीरसागर, शुभम ढोके यांच्यासह सर्वश्री राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news