Nagpur Crime News
Nagpur Crime News File Photo

Nagpur Crime | कर्तव्यावर असलेल्‍या महिला पोलिसाला दुचाकीस्‍वाराने नेले ओढत!

इतवारी दहीबाजार परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ
Published on

नागपूर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा ताफा रस्त्याने जात असताना मार्ग रोखणाऱ्या एका महिला पोलीस शिपायाशी एका दुचाकीस्वराराने गैरवर्तन केले. शिवीगाळ, मारहाण करीत तिला ओढत नेल्याची घटना घडली. इतवारी दहीबाजार परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वसामान्यांसोबतच आता पोलिसही असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.

Nagpur Crime News
Nagpur Crime News : महालातील गडकरींचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी, तरुण ताब्यात

सैय्यद सज्जाद मुजफ्फर अली कश्यप कॉलनी, शांतीनगर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेट मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या गावात आणि मंत्र्यांचा ताफा जात असल्याने रस्ता रोखलेला असताना मोठ्या जमावदेखत हा प्रकार उपराजधानीत घडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

Nagpur Crime News
Nagpur Crime | दारू पिण्यावरून वाद; लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून केला खून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news