Nagpur Crime : अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने मामीची निर्घृण हत्या

अपहरण करून लाठीने डोक्यावर, हात-पायांवर केले वार; दोन दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू, आरोपी अटकेत
 Crime News
Crime News Pudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर : अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याचा राग मनात धरून तिच्या मामीचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ३५ संशयीत आरोपीने 35 वर्षीय अपहरण करून लाठीने डोक्यासह हात-पायांवर बेदम मारहाण केल्याचे समजते आहे. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली; मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी अक्षय शालिकराम करोटे याला अटक केली आहे.

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा आरोप अक्षय करोटे याच्यावर होता. यादरम्यान मुलीच्या मामीने या प्रेमप्रकरणाला विरोध केला होता. याचाच राग मनात धरून संशयीत आरोपीने मामीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर संधी साधून त्याने त्यांचे अपहरण केले.

संशयीत आरोपीने मुलीच्या मामीला दुचाकीवरून वाठोडा परिसरात नेले. तेथे त्याने लाठीने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर अमानुषपणे वार केले. या हल्ल्यात मामी गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, जखमी अवस्थेत मामींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसरीकडे हलविण्यात आले. मात्र, दोन दिवस उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. अखेर गुरुवारी आरोपी अक्षय शालिकराम करोटे याला अटक करण्यात आली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी हत्या आणि घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.