Nagpur congress | काँग्रेस हायमांडचा मोठा निर्णय! तब्बल १३ वर्षांनंतर नागपूर काँग्रेसचा चेहरा बदलला; प्रफुल्ल गुडधेंकडे नेतृत्व प्रफुल्ल

काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी अनेक काँग्रेस नेते नागपूरात दाखल झाले होते
Congress
CongressPudhari
Published on
Updated on

नागपूर : शहर काँग्रेस अंतर्गत अंतर्गत धुसफूस आणि जोरदार राजकीय घडामोडींनंतर अखेर शहर अध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेवक आणि राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यापूर्वी दोनदा दिलेले राजीनामे पक्ष नेतृत्वाने नामंजूर केले होते. मात्र, मनपा निवडणुकीतील कामगिरीनंतर सुरू झालेल्या नव्या निवडणूक प्रक्रियेत हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

Congress
5 States Assembly Election Campaign | राज्यांच्या नेतृत्वाची कसोटी

अंतर्गत नाराजी नाट्य आणि आमदारांमधील वाद

या निवडीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत हे आपले पुत्र कुणाल राऊत यांना शहराध्यक्ष बनवण्यासाठी आग्रही होते. यावरून पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतच नेत्यांमधील नाराजी उघड झाली आणि दोन आमदारांमध्ये जोरदार वाद (भिडणे) झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल गुडधे यांची ही निवड म्हणजेच एका अर्थी ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Congress
...तर सरकार अडचणीत, केसरकरांनी आमदारांची यादी द्यावी; वडेट्टीवार यांची मागणी

प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह दिग्गज नेते नागपुरात

दरम्यान, केरळचे नवनियुक्त गृहमंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर विमानतळावर आगमन झाले. येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभासाठी काँग्रेसच्या दिग्गजांनी नागपुरात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला कुणाल चौधरी (राष्ट्रीय सचिव), नाना गावंडे (प्रदेश काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष), सुरेश भोयर (उपाध्यक्ष), आमदार विकास ठाकरे (मावळते शहर अध्यक्ष), मुजीब पठाण (प्रदेश काँग्रेस महासचिव), विजय सरटकर (प्रदेश काँग्रेस सचिव) आणि संजय महाकाळकर (नागपूर मनपा विरोधी पक्षनेते) उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news