Nagpur Congress | नागपुरात काँग्रेस भाकरी फिरविणार: विकास ठाकरेंच्या जागी नवा अध्यक्ष कोण?

गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांची नावे चर्चेत
Vikas Thakre
Vikas ThakrePudhari
Published on
Updated on

New Nagpur Congress President

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : लोकसभा, विधानसभा, महापालिकेत सत्ता मिळू शकली नाही. आता पुढील तीन वर्षे खरेतर कुठलीही निवडणूक नसताना काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या भाकरी फिरविण्याच्या तयारीत आहे. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी दोनदा मला मुक्त करा, अशी विनंती पक्षाकडे केली होती. परंतु त्यांचा राजीनामा पक्षाने नाकारला. आता त्यांच्या जागी तब्बल 12 वर्षानंतर नवा अध्यक्ष कोण होणार यासंदर्भात उत्सुकता आहे.

ठाकरे समर्थक गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड अशी काही नावे चर्चेत आहेत. मात्र, यातूनच दोघांची मनपात स्वीकृत सदस्य म्हणूनही वर्णी लागण्याची शक्यता लक्षात घेता आमदार ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण? हे गुलदस्त्यात आहे. पक्ष निरीक्षक तीन दिवस नागपुरात तळ ठोकून असून विधानसभा निहाय ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून 15 एप्रिलनंतर ते पक्षाध्यक्ष यांना आपला अहवाल सादर करणार आहेत.

Vikas Thakre
Nagpur news | जिल्ह्यात डिजिटल क्रांती: 71 टक्के वीजबिलांचा भरणा ऑनलाईन

ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढविल्याने पक्षात त्यांचे वजन वाढले असले तरी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्याच मर्जीतील अध्यक्ष पक्षश्रेष्ठी देणार की, भाकरी फिरविणार ? हे लवकरच उघड होणार आहे. दुसरीकडे नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्येही संघटन सृजन अभियान अंतर्गत अध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत.

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांची काँग्रेसच्या गटबाजी, राजी नाराजीत अलीकडेच नियुक्ती झाली. एआयसीसी निरीक्षक राव दान सिंग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे सहनिरीक्षक खा.कल्याण काळे, वजाहत मिर्जा, शिवा राव ही मंडळी शनिवारी (दि.११) नागपुरात पोहोचली. 15 एप्रिलपर्यंत नागपूर जिल्हा ग्रामीण दौऱ्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीला वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news