Nagpur Bribe | नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय लाच प्रकरण; महसूल सहाय्यकाच्या घराची झाडाझडती, आयफोन जप्त

1135 चौरस फूट प्लॉटवर झालेल्या बांधकाम संबंधी प्रकरण मार्गी लावण्यासाठी मागितली लाच
Bribe  Case
Bribe Case Pudhari
Published on
Updated on

Revenue Assistant bribe Nagpur Collector Office

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश साधूरावजी बर्वे, (वय 54) यास 5 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे मालकीचे शिवाजीनगर, महाल, नागपूर येथील 1135 चौरस फूट प्लॉटवर झालेल्या बांधकाम संबंधाने तक्रारदार यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर (स्लम) येथे अपील दाखल केली होती.

Bribe  Case
Nagpur News: अति सुखाचा हव्‍यास.. लग्‍नाआधी थेट मृत्‍यूशी 'गाठ'! भावी पत्नीला भेटण्यापूर्वी 'ते' औषध तरुणाच्या जीवावर बेतले

तक्रारदार यांचे प्रकरण निकाली काढण्याकरिता बर्वे यांनी 5 लाख रुपयांची मागणी केली. शुक्रवारी (दि.24) रात्री 11 ते 12 दरम्यान नंदनवन लेआऊट परिसरात आपल्या घराजवळ बोलावले होते. तक्रारदारासोबत एसीबीने सापळा रचून सदर रक्कम स्वीकारताच महसूल सहाय्यक बर्वे यास ताब्यात घेतले.

यासोबतच आयफोन ताब्यात घेण्यात आला असून आरोपीची घरझडती देखील केली जात आहे. पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भारती गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विवेक पडघान यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news