

नागपूर : दहावीच्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बुडालेल्या तरूणाने मुलीला रस्त्यात गाठले. आणि त्यांनतर तिच्यावर चाकूने वार करत तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.३०) अजनी रेल्वे कॉलनी परिसरात सायंकाळच्या सुमारास घडली. एंजल जॉन (रा. कौशलायन नगर) असे या मुलीचे नाव आहे.
एंजल ही शुक्रवारी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील सेंट अँथनी शाळेतून मैत्रिणींबरोबर घरी निघाली होती. यावेळी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अल्पवयीन तरूणाने तिला रस्त्यात अडविले आणि तिच्यावर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला.
गेले काही दिवसांपू्वी एंजल आणि आरोपी अल्पवयीन मुलाची ओळख झाली होती. तो सेंट अँथनी शाळेचाच माजी विद्यार्थी होता. एंजल त्याला आवडत होती मात्र, ती त्याला भाव देत नव्हती, यामुळे तो संतापला होता. या रागातून त्याने शाळेतून बाहेर पडत असताना एंजलला रस्त्यात गाठले व तिची निर्दयीपणे खून केला. मुलीच्या आवाजामुळे लोकांनी परिसरात धाव घेतली असता त्याने आपली मोटरसायकल त्या ठिकाणीच टाकून तेथून पळ काढला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.