

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांची ही निवड आहे.
रविवारी (ता.२४) रोजी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाची निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी निवड झाल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. नव्या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अजय विजयवर्गीय, सचिवपदी दतू समिरितकर, सहसचिवपदी प्रभाताई निमोने, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर बजाज यांची निवड करण्यात आली. सभेला केशवराव फुलझेले महाराज, सुशीला मंत्री, डॉ. नंदिनी त्रिपाठी, स्वामी श्री निर्मलानद महाराज, लक्ष्मीकांत तडस्कर उपस्थित होते.
सर्व उपक्रम सुरू ठेवणार – बावनकुळे
हेही वाचा