Nagpur Bus Accident | बसची दूध वाहनाला धडक : विचित्र अपघातात एकाचा मृत्यू, चार जखमी

एलईडी चौकातील घटना
Nagpur Bus Milk Truck Crash
Nagpur Bus Milk Truck CrashPudhari
Published on
Updated on

Nagpur Bus Milk Truck Crash

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने खासगी कंपनीचे दूध घेऊन जाणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या वाहनाच्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू तर चालकासह इतर चार जण जखमी झाले. एलईडी चौक येथे ही घटना घडली.

या अपघातात दूध वाहून नेणारें इंट्रा टाटा कमर्शिअल गाडी क्रमांक एम एच 31 जी.डी 0585 हे वाहन रामनगर कडून अभ्यंकर नगरकडे चौक कडे जात होते. त्याला शंकर नगर चौककडून अंबाझरी टी पॉइंटकडे जाणारी एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच 40 वाय 5127 ने बेदरकारपणे जोरदार धडक दिली. त्यामुळे टाटा v30 गाडी ही रस्त्याच्या कडेला चौकात उभे असलेल्या तीन व्यक्तींवर जाऊन आढळली.

Nagpur Bus Milk Truck Crash
Nagpur news: शांततापूर्ण आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; अनिल देशमुखांचे राष्ट्रपतींना निवेदन

सुनील आनंदराव जाधव (वय 65, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, नागपूर) यांचा घटनास्थळीच गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. इतर चार जखमीमध्ये सुनील कुशालराव गुडदे (वय 62, रा. गांधीनगर, अंबाझरी), शैलेंद्र मारोतराव किनगावकर (वय 62, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, पोलीस ठाणे, बजाज नगर) यासोबतच टाटा v30 गाडीचा चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे (वय 23, रा. खापरखेडा, कोराडी रोड) असे चार जण जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news