

IPS Krishnakant Pandey Daughter Death Case
नागपूर : एम्समध्ये त्वचारोगतज्ज्ञ विभागात प्रथम वर्षात शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थिनीने खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सीआरपीएफचे पोलीस महासंचालक डीजी आयपीएस कृष्णकांत पांडे यांची समृद्धी ही मुलगी असून या घटनेने एम्स रुग्णालय व्यवस्थापन आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे. शिव कैलास येथील मंजिरा अपार्टमेंटमध्ये समृद्धी आणि तिची मैत्रिण राहत होती. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास समृद्धीची मैत्रीण रूमवर आली असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. मागील बाजूने जाऊन बघितले असता 25 वर्षीय समृद्धी सीलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
लागलीच एम्स व्यवस्थापन, सोनेगाव पोलिस व नंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली. अतिशय विनम्र, हुशार असलेल्या समृद्धीने टोकाचे पाऊल का उचलले याविषयी गूढ कायम आहे. सोनेगाव पोलिसांनी तिच्या मैत्रिणींचीही चौकशी केली आहे.