Fake Minority Status Scam | नागपुरातील बोगस अल्पसंख्यांक दर्जा प्रकरण: शाळा संचालकांसह ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी पोलीस उपायुक्तांना दिले होते चौकशीचे आदेश
Fake
FakePudhari
Published on
Updated on

Nagpur Bogus Minority School Case

नागपूर : शहरात बोगस अल्पसंख्यांक दर्जा मिळवून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. फिरोज गांधी विद्यालय, नागपूर व संबंधित फिरोज विद्या समिती, मिलिंद नगर येथील पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी मोहम्मद अली आझाद यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे -

कृष्णकुमार केदारनाथ पांडे, दुर्गाप्रसाद आसाराम गुप्ता, धीरज रत्न कृष्णकुमार पांडे, योगेंद्र रामलोचन शुक्ला, हरिभाऊ नामदेवराव किरपाणे, श्रीमती छाया देवी कृष्णकुमार पांडे, अनिलकुमार केदारनाथ पांडे, श्रीमती रितू अनिरुद्ध तिवारी आणि विष्णुकुमार केदारनाथ पांडे अशी आहेत. शिक्षण विभाग संयुक्त चौकशी करणार का?

Fake
Nagpur Congress | नागपुरात काँग्रेस भाकरी फिरविणार: विकास ठाकरेंच्या जागी नवा अध्यक्ष कोण?

बोगस अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त केल्यानंतर संबंधित शाळेच्या संचालकांनी शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा, आर्थिक निधी तसेच बोगस भरती केल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शिक्षण विभागाने संयुक्त चौकशी केल्यास मोठा गैरप्रकार उघडकीस येऊ शकतो.

चौकशीत उघड गंभीर प्रकार

या प्रकरणाची गंभीर दखल राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी घेतली होती. त्यांनी पोलीस उपायुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस विभागाने केलेल्या तपासात संबंधित संस्थेकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले. आता या कारवाईनंतर प्यारे खान यांनी राज्यभर “बोगस पद्धतीने अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Fake
Nagpur news | जिल्ह्यात डिजिटल क्रांती: 71 टक्के वीजबिलांचा भरणा ऑनलाईन

अल्पसंख्यांक दर्जा मिळालेल्या शैक्षणिक संस्थांना काही विशेष अधिकार व सवलती मिळतात. त्यामुळे खोट्या कागदपत्रांच्या आधारे असा दर्जा मिळवणे हा गंभीर आर्थिक व कायदेशीर गुन्हा मानला जातो. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news