Vidarbha School News: शाळा ३० जूनपासून सुरू होणार, नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

शाळा ३० जून पासून सुरू करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने आज दिले. यापूर्वी विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता.
Schools
SchoolPudhari
Published on
Updated on

Vidarbha school reopening date

नागपूर: विदर्भातील शाळा ३० जून पासून सुरू करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने आज दिले. यापूर्वी विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र विदर्भातील उन्हाच्या तडाख्यामुळे शाळा उशिरा सुरू कराव्या यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर शिक्षण विभागाने अचानक मंगळवारी (दि. ९) रात्री परिपत्रक काढून विदर्भातील शाळा २२ जून पासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याप्रकरणी न्यायालयाने आज शिक्षण संचालकांनी काढलेल्या पत्रावर ताशेरे ओढले. नागपूर खंडपीठ आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना अशा पद्धतीचा आदेश शिक्षण संचालकांनी का काढला? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

Schools
School Lunchbox Ideas: मुलांचा डबा ठरवतोय त्यांचा रिझल्ट; जाणून घ्या तज्ज्ञांचा काय आहे सल्ला!

राज्य सरकारकडून एकवाक्यता म्हणून एका दिवशी सगळ्या शाळा सुरू करण्याची भूमिका सरकारी वकीलांनी मांडली. यावर एकवाक्यता आणायाची आहे, तर १५ जूनच का १ जुलै का नाही? असा सवाल ही उपस्थित करत एकवाक्यतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

न्यायालयाने शिक्षण संचालकांनी काढलेली दोन्ही परिपत्रके रद्द करत ३० जून पासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील जवळपास २० हजार शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Schools
Teacher Inspection: पोरं सोडा, गुरुजींनाच येईना उत्तर! सातवीच्या वर्गाची गुणवत्ता पाहून सीईओंचा चढला पारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news