BEd CET Exam Cancelled | 'बीएड सीईटी'चा पेपर तांत्रिक अडचणीत अडकला: विद्यार्थ्यांचा खोळंबा, अखेर पेपर रदद्

वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला
BEd CET Technical Issue Nagpur
वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. Pudhari
Published on
Updated on

BEd CET Technical Issue Nagpur

नागपूर: बीएड सीईटीचा दुसऱ्या सत्रातील पेपर तांत्रिक अडचणीत अडकल्याने विद्यार्थी खोळंबले. वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.२७) तीव्र संताप व्यक्त केला. अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहित्यानुसार आज सेकंड शिफ्टचा वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट डोंगरगावमध्ये पेपर होता. तीन वाजताचा पेपर बराच वेळ सुरू झालेला नाही. मुलांना बसायला कम्प्युटर्स नाही. कम्प्युटरवर नेट नेटवर्क नाही, असे उत्तर देणे सुरू होते.

परीक्षा घेण्याचा कंत्राट AssesInfra या कंपनीला दिला असुन त्यांने EduSpark या कंपनी ला परीक्षा केंद्रावर सॉफ्टवेअर चालवणे तसेच परीक्षा घेण्याचा काँट्रॅक्ट दिल्याची माहिती पुढे आली. ही परीक्षा घेण्यासाठी लागणारा सर्व्हर देखील eduspark स्वतः आणते. दरम्यान, महाविद्यालयाचे काम परीक्षेकरिता संगणक, बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे असते.

BEd CET Technical Issue Nagpur
Nagpur news | मायबाप सरकार टंचाई नाही मग पेट्रोल पंपावर रांगा का ? लोक संतापले

महाविद्यालयाने ३ ते चार दिवस आधी सर्व बैठक व्यवस्था व संगणक Eduspark कडून आलेल्या ३ इंजिनिअर्सला दिले. मुळात त्यांनी परीक्षेच्या आधीच सर्व संगणक व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करणे आवश्यक होते, ते त्यांनी केले. परंतु, आज परीक्षेच्या अगदी अर्धा तास आधी सर्व्हरला तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले, असे वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांत होणार परीक्षा

अखेर आज (दि. २७) नियोजित असलेली दुपारच्या सत्राची परीक्षा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. संबंधित परीक्षार्थ्यांना सुधारित दिनांक तसेच नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच ईमेल आणि एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ही परीक्षा आता २८ किंवा २९ मार्च रोजी आयोजित केली जाणार असल्याचे कळविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news