Nagpur Airport expansion : विमानतळ विस्तारात, नागपूर होणार लॉजिस्टिक हब, 100 हेक्टरवर एअरपोर्ट सिटी

जीएमआरची 30 हजार युवकांना रोजगाराची हमी
Nagpur Airport expansion : विमानतळ विस्तारात, नागपूर होणार लॉजिस्टिक हब, 100 हेक्टरवर एअरपोर्ट सिटी
Published on
Updated on

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रूपांतर एका आधुनिक एव्हिएशन तसेच कार्गो हब आणि 100 एकरातील एअरपोर्ट सिटीमध्ये लवकरच होणार आहे.केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिल्यानंतर या कामाला वेग आला आहे. नागपूर हे मध्य भारताचे एक मोठे व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास जीएमआर समूहाचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर आणि जीएमआर नागपूर एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याचा मोठा फायदा या प्रकल्पाला मिळणार आहे. जीएमआर येथे एक अत्याधुनिक कार्गो कॉम्प्लेक्स उभारणार आहे. सुरुवातीला २० हजार मेट्रिक टन आणि भविष्यात 1.5 लाख मेट्रिक टन वार्षिक कार्गो हाताळणीची क्षमता राहील. नागपूर मध्य भारताचे मुख्य लॉजिस्टिक हव बनेल. विदर्भ आणि नागपूरच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात 30 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी हमी दिली.

Nagpur Airport expansion : विमानतळ विस्तारात, नागपूर होणार लॉजिस्टिक हब, 100 हेक्टरवर एअरपोर्ट सिटी
Coal gasification plants | देशात कोळशापासून गॅस तयार होणार, ३७ हजार ५०० कोटी रुपयांच्या योजनेला केंद्राची मंजूरी

जीएमआर समूहाने नागपूर विमानतळाचे संचालन अधिकृतपणे आपल्या हाती घेतले आहे. तीस वर्षांच्या सवलत करारांतर्गत कंपनीला हे विमानतळ विकासासाठी मिळाले आहे. नागपूर विमानतळ आणि मिहान परिसरातील सुमारे १ हजार ३२० हेक्टर जमीन 30 वर्षांच्या लीजवर हस्तांतरित करण्यात आली. यातील अंदाजे शंभर हेक्टर जागेवर जागतिक दर्जाची एअरपोर्ट सिटी विकसित करण्यात येणार आहे. एअरपोर्ट सिटीत आधुनिक व्यावसायिक संकुले, पंचतारांकित हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, बिझनेस पार्क आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे कन्व्हेन्शन सेंटर्स उभारले जाणार आहेत.

Nagpur Airport expansion : विमानतळ विस्तारात, नागपूर होणार लॉजिस्टिक हब, 100 हेक्टरवर एअरपोर्ट सिटी
अर्थवार्ता : एअर इंडियाचा तोटा २६,७९८ कोटींवर! इंधन दरवाढ आणि पश्चिम आशियातील संघर्षाचा विमान कंपनीला फटका

जीएमआरचा विकास आराखडा

या विमानतळाची सध्याची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे ३० ते ३५ लाख आहे. ती जीएमआर तीन कोटी आणि भविष्यात पाच कोटींवर नेणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी विद्यमान टर्मिनल इमारतीच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त किओस्क विस्तारित सुरक्षा क्षेत्र चेक-इन काउंटर्स, सेल्फ चेक-इन अपग्रेड केलेले वॉशरूम्स आणि त्यानंतर, पुढील काही वर्षांत मिहान-एसईझेड आणि विमान दरुस्ती विशेष लाउंज तयार केले जातील. केंद्राजवळ (एमआरओ) एक नवीन य व एकात्मिक टर्मिनल इमारत बांधली जाईल. भविष्यात समांतर अशी 4 चार हजार मीटरची धावपट्टी आणि नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उभारणार आहे. तसेच दोन टर्मिनल इमारती देखील तयार होणार आहेत. एकंदरीत नागपूर विमानतळ येत्या काही वर्षात पार बदललेले दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news