Nagpur Mahavitran | महावितरण पथकाची पहाटे धाड : संशयास्पद 50 ग्राहकांची मीटर तपासणी; वीजचोरांचे धाबे दणाणले

Electricity Meter Inspection | नरखेड तालुक्यातील बेलोना गावातील 50 ग्राहकांच्या मीटरची तपासणी
Electricity Meter Inspection
Electricity Meter Inspection Pudhari News Network
Published on
Updated on

Nagpur Belona Village Power Raid

नागपूर : नरखेड तालुक्यातील बेलोना गावात मंगळवारी पहाटे महावितरणच्या पथकाने धडक टाकत संशयास्पद 50 ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. या धडक मोहिमेमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईत एकूण ५० संशयास्पद विद्युत जोडण्यांची तपासणी करण्यात आली. ज्यात 6 ग्राहकांना प्रत्यक्ष वीज चोरी करताना रंगेहात पकडले. या ग्राहकांवर वीज कायदा 2003 (सुधारित 2007) च्या कलम 135 अन्वये सुमारे 35,000 रुपयांची अनियमितता उघडकीस आणून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Electricity Meter Inspection
Nagpur Fire Case | आगीचे तांडव! कामठीतील कारखान्यात 17 सिलिंडरचे एकामागून एक स्फोट

काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक अगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेत सहाय्यक अभियंता शुभम हेडाऊ व नीलेश मेश्राम, कनिष्ठ अभियंता रोहित मेश्राम, सौरभ नैताम वरितेश रामटेके सहभागी झाले.

वीज चोरीमुळे वितरण प्रणालीवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्राहकांना कमी व्होल्टेज किंवा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागतो. ही मोहीम केवळ दंडात्मक नसून, प्रत्येक ग्राहकाला हक्काची आणि सुरक्षित वीज मिळावी यासाठीचे एक सकारात्मक पाऊल असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news