Nagpur Fire Case | आगीचे तांडव! कामठीतील कारखान्यात 17 सिलिंडरचे एकामागून एक स्फोट

Nagpur Fire Case | कामठी तालुक्यातील कवठा येथील 'सत्य एंटरप्रायजेस' या प्लास्टिक स्टिकर तयार करणाऱ्या कारखान्याला सोमवारी रात्री भीषण आग लागली.
Nagpur Fire Case
Nagpur Fire Case
Published on
Updated on

नागपूर: कामठी तालुक्यातील कवठा येथील 'सत्य एंटरप्रायजेस' या प्लास्टिक स्टिकर तयार करणाऱ्या कारखान्याला सोमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Nagpur Fire Case
Nashik Airport | नाशिकच्या ओझर विमानतळाचा गगनभरारी; एकाच दिवसात 1,973 प्रवाशांचा नवा उच्चांक

मिळालेल्या माहितीनुसार, मेहाडिया यांच्या मालकीच्या या कारखान्यात रात्री एकच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कारखान्याला वेढले.

कारखान्यात ठेवलेल्या १६ ते १७ गॅस सिलिंडरचा एकामागून एक मोठा स्फोट झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीच्या ज्वाळा १०० ते २०० फूट उंच उसळत होत्या, ज्या दूरवरूनही स्पष्ट दिसत होत्या.

Nagpur Fire Case
Chandrapur Mayor Election | कसा उलटला काँग्रेसचा डाव अन् चंद्रपूर महापालिकेत भाजप आघाडीचा झाला महापौर

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन्स, त्रिमूर्ती नगर, सुगत नगर आणि वाठोडा यांसारख्या ११ केंद्रांतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत कारखान्यातील सर्व यंत्रसामग्री आणि कच्चा माल जळून भस्मसात झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news