MNS Protest Nagpur | मटण मार्केट विरोधात मनसेचे अनोखे आंदोलन; नागपूरच्या सहाय्यक आयुक्तांना दिल्या कोंबड्या भेट

सहकारनगर भागात अवैधपणे सुरू असलेल्या मटन मार्केट विरोधात मनसे कार्यकर्ते संतप्त
Civic Issues Protest Nagpur
लक्ष्मी नगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांना कोंबड्या भेट देताना मनसे कार्यकर्ते (Pudhari Photo)
Published on
Updated on

Civic Issues Protest Nagpur

नागपूर : सहकार नगर भागात अवैधपणे सुरू असलेल्या मटण मार्केट विरोधात या भागातील संतप्त नागरिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात अनोखे आंदोलन केले. लक्ष्मी नगर झोनच्या सहाय्यक आयुक्तांना चक्क कोंबड्या भेट दिल्या. या पद्धतीने मार्केटला विरोध करण्यात आला.

मटन मार्केटला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सरळ सरळ पाठिंबा असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, कारवाई केली जात नाही, असाही आरोप करण्यात आला. सहाय्यक आयुक्त चौधरी यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोंबड्या भेट दिल्या.

Civic Issues Protest Nagpur
नागपूर हादरलं! "आता जगण्यात अर्थ नाही..."वृद्ध दाम्पत्याने उचललं टोकाचं पाऊल, पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू

यावेळी प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, मनसे नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. यावेळी मार्केटमुळे होणारा त्रास, वाढलेली दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य, वाढते अपघात एका महिलेचा झालेला मृत्यू याकडे कडे लक्ष वेधले. हे इशारा आंदोलन असून यापुढे कार्यालय परिसरातच आम्ही अवैध मटण मार्केट सुरू करू असा इशारा दिला.

Civic Issues Protest Nagpur
Central Railway : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर साठी विशेष रेल्वे; बघा एका Click वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news