Devendra Fadnavis | ओबीसींचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला दिले जाणार नाही : मुख्यमंत्री

मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी पहिल्यापासून आमची भूमिका सकारात्मक
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis(Pudhari Photo)
Published on
Updated on

Maratha Reservation vs OBC Quota

नागपूर : ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला दिले जाणार नसल्याने ओबीसी समाजाला घाबरण्याची गरज नाही. मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात सुरुवातीपासून आमची भूमिका सकारात्मक राहिली आहे. न्यायालय, कायदा आणि संविधान या चौकटीत राहून आम्ही कुठलाही निर्णय घेण्यास तयार आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

सध्या यासंदर्भात चर्चा सुरू असल्याने मी अधिक तपशीलवार बोलणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजासाठी मी आणि एकनाथ शिंदे यांनी इतिहासात सर्वाधिक निर्णय घेतले आहेत, यावर भर दिला. शेवटी केवळ प्रसिद्धीसाठी घेतलेले निर्णय टिकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय, न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊनच पुढे जावे लागणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरागे पाटील यांनी शनिवारपासून (दि.३०) पुन्हा एकदा मराठा समाजाच्या प्रश्नांवर भर उन्हाळ्यात उपोषण सुरू केले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी सरकारकडून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि.३०) नागपूर महापालिकेच्या भांडेवाडी कचरा डंपिंग यार्ड, नव्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis | साठेबाजांच्या मुसक्या आवळा

सरकारची सर्व समाजाविषयी भूमिका पारदर्शक, सकारात्मक राहिली आहे. दोन समाज परस्परापुढे आणून आम्हाला भांडण करायचे नाही. आम्ही सर्व समाजाचे हित जोपासतो, यावर भर दिला.

देशातील हा पहिला ड्राय सीबीजी कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प असून 1200 टन क्षमतेचा, 28 टीबीडी गॅस, 120 सेंद्रिय खत आणि 400 टीवीडी सिमेंट कंपन्यासाठी कच्चा माल तयार होईल. एकप्रकारे कचऱ्यातून मोठी व्हॅल्यू निर्मिती होईल. 300 कोटींची खासगी गुंतवणूक यात असून कुठेही कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Vande Bharat journey: मुख्यमंत्र्यांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास

भांडेवाडीमध्ये वर्षानुवर्षे असलेले कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी सहा आठ महिन्यात संपेल. दरम्यान, इंधन दरवाढ ही अटळ आहे. अमेरिकेसह जगभरात हे दर वाढले आहेत. इंधन संकट कमी होताच पुन्हा हे दर पूर्ववत होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news