

Babanrao Taywade on Maratha Reservation
नागपूर: एकीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले. सहा मागण्या मान्य झाल्या म्हणून जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मुंबईकर आणि सरकारला मोठा दिलासा गणेशोत्सवात मिळाला. तर दुसरीकडे नागपुरात संविधान चौकात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाचे उपोषण मात्र सुरूच आहे.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यामुळे उपोषण करण्यात अर्थ नाही, असे काल स्पष्ट केले. मात्र, मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखविली. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधून आरक्षण सरकारने देऊ नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 30 ऑगस्टपासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, याचे प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या उपोषणाचा आज बुधवारी पाचवा दिवस आहे. यापूर्वी 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमधून आरक्षण दिले जाणार नाही असे लिखित दिले होते. ओबीसी समाजाच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय साखळी उपोषण सोडणार नाही. असे डॉ. तायवाडे यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.
या उपोषणाला भावना बावनकर, सुरेखा शेरेकर, सुषमा डुकरे, ममता डुकरे, प्रज्वला गावंडे, श्रीहरी सातपुते, देवेंद्र मुंगळे, मारोती अतकरे, गजानन शिंदे, हेमराज गोमासे, नंदकिशोर काकडे, हेमंत गावंडे, तसेच या आंदोलनाला धनोजे कुणबी समाज विकास महासंघ यांनी पाठिंबा दिला.
डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाचे कल्याण काका आखाडे, माजी उपाध्यक्ष राहुल पावडे, माजी सभापती रोषण पचारे, यांनी पाठिंबा दिला. सहसचिव शरद वानखेडे, परमेश्वर राऊत, अविनाश पाल, कामडी सर, नितीन गोहणे. कवींद्र गोहनकर, अर्जुन दडे बीड, राहुल करांगडे, निलेश कोढे, राजू गोसावी, श्रीकांत मसमारे आदीसह चंद्रपूर जिल्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे असंख्य कार्यकर्ते हजर होते.