

नागपूर - छत्तीसगडमध्ये 27 माओवादी मारले गेले. महाराष्ट्रात अनेकांनी आत्मसमर्पण केले. आता माओवाद निश्चितपणे शेवटच्या घटका मोजत आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मास्टरमाईड, देशातला जहाल नेता बसव राजू याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे. हा अशा प्रकारचा व्यक्ती होता ज्यानी चंद्राबाबू नायडू यांच्यावरील हल्ला तसेच छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे नेते, अनेक मंत्री यांना मारले होते.
75 सीआरपीएफ, केंद्रीय पोलीस जवान यांच्या हत्येत हात होता तो बसव राजू आणि इतर 26 माओवादी बस्तरमधील चकमकीत मारले गेले आहेत. याशिवाय महाराष्ट्रामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे पाच माओवादी यांनी आत्मसमर्पण केले पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. याशिवाय 20 पेक्षा जास्त लोकांचे आजवर आत्मसमर्पण झाले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.