मराठी भाषा सक्ती, काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवू असेही त्यांनी स्पष्ट केले
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.Pudhari News
Published on
Updated on

Mandatory Marathi Language: What Did Chief Minister Fadnavis Say?

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर मुंबई असो किंवा महाराष्ट्र, मराठी भाषेचा आग्रह धरणे काही गैर नाही. मात्र महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक असोत किंवा टॅक्सीचालक असोत, त्यांच्यावर मराठी भाषेची जबरदस्ती करणे योग्य नाही. देशात कुठेही भाषेच्या आधारावर हिंसा करणे आम्हाला मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी रात्री माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रातील ऑटो चालक आणि टॅक्सीचालक ज्यांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis | राज्यात एकच ठाकरे ब्रँड, कोणी स्वत:ला... : मुख्यमंत्री फडणवीस

आम आदमी पार्टीने लोकांना जे स्वप्न दाखवले होते, ते पूर्ण न करता लोकांची फसवणूक केली. त्यामुळे लोक आप पक्ष सोडून चालले आहेत. ज्या लोकांनी ‘इंडिया अगेंस्ट करप्शन’ या आंदोलनातून नंतर आम आदमी पक्ष स्थापन केला, त्या सर्वांचा नंतर मोहभंग झाल्याने ते गेल्या काही वर्षांत आप पक्षातून बाहेर पडले आहेत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis | काँग्रेसने गुंडांना तिकिटे दिली, कुठलीही दहशत खपवून घेणार नाही : मुख्यमंत्र्यांनी ठणकावले

आता आप पक्षात जे लोक आहेत, त्यांनाही कळले आहे की आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा बुरखा पांघरून फक्त सत्तेसाठी कारभार चालवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून जे नेते भाजपमध्ये आले, ते देशाच्या मुख्य प्रवाहात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news