

नागपूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.अशातच नागपुर जिल्ह्यात काँग्रेसला वगळून भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न शरद पवारांची राष्ट्रवादी करीत आहे. यासंदर्भात पुढाकार घेण्याचा हा प्रयत्न केला असून सेक्युलर पक्षाला एकत्र करून येणा-या निवडणुकीला सामोर जाण्याच्या प्रयत्न असल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व गेल्या 2024 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत दगाबाजी केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मित्रपक्ष उमेदवार असलेल्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष हा परस्पर उमेदवार देतो व आपल्याच कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यास प्रवृत्त करत असल्याच्या आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे.