

Maharashtra Farmer Loan Mortgage:
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने शेतकरी हिताचा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २ लाखांपर्यंत पीक कर्ज घेताना लागणारे संपूर्ण तारण शुल्क शेतकऱ्यांसाठी माफ करण्यात आले असून, याबाबतचे अधिकृत राजपत्र जारी झाले आहे.
या निर्णयामुळे कर्जप्रक्रियेतील आर्थिक ओझे कमी होणार असून शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि सन्मानजनक पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल. शेती मजबूत झाली तरच शेतकरी समृद्ध होईल, आणि शेतकरी समृद्ध झाला तरच राज्य व देश प्रगत होईल, या ठाम विश्वासातून घेतलेला हा निर्णय आहे.
एकप्रकारे शेतकऱ्यांच्या कष्टांना आधार देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि शेतीच्या भविष्याला दिशा देणारा हा निर्णय महायुती सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करतो. या निर्णयाचे जनतेतून स्वागत होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.